जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । डॉ. विजय माहेश्वरी यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याबद्दल युवासेनेतर्फे भेट घेऊन भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांचे विद्यापीठ विषयक व्हिजन जाणून घेतले.
युवासेना प्रमुख ना. आदित्य ठाकरे, सचिव वरुणजी सरदेसाई तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनात युवासेना विद्यार्थी हितासाठी सदैव विद्यापीठ प्रशासनासोबत सकारात्मक व रचनात्मक कार्य करण्यासाठी अग्रस्थानी राहणार असा विश्वास यावेळी दिला.
यावेळी युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, युवासैनिक शंतनू नारखेडे व प्रीतम शिंदे उपस्थित होते.