⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावच्या युवा सैनिकाने ट्विट करून ना.नितीन गडकरींना केले सतर्क

जळगावच्या युवा सैनिकाने ट्विट करून ना.नितीन गडकरींना केले सतर्क

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । शहरातील आकाशवाणी चौकाजवळ असलेल्या स्व.जनरल अरुणकुमार वैद्य चौकात महामार्गावर सर्कल उभारण्यात आला आहे. देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांनी त्या सर्कलकडून येऊन नये असे आवाहन करणारे ट्विट जळगावातील युवासेना पदाधिकारी विराज कावडिया यांनी केले आहे.

जळगावातील आकाशवाणी चौकातील सर्कल धोकादायक असून दोन दिवसांपूर्वी त्याठिकाणी अपघात झाला होता. नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या या चौकात सर्कल केल्यापासूनच लहानमोठे अपघात होत आहे. काही दिवसापूर्वी तर एका भावी डॉक्टरला मृत्यूशी झुंज द्यावी लागली होती. मंगळवारी सकाळी सर्कलवर अपघात झाल्यानंतर युवसेनेने नहीच्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देत त्यांचा सत्कार केला होता.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उद्या दि.२२ रोजी जिल्ह्यात येणार आहे. शहरातील महामार्गासंदर्भात असलेल्या विविध तक्रारींचे निवेदन त्यांना काही संघटनांकडून दिले जाणार आहे. दरम्यान, युवा सेना सहसचिव विराज कावडिया यांनी ट्विट करीत ना.नितीन गडकरी यांना सतर्क तर केलेच आहे परंतु महामार्गाने येताना आकाशवाणी चौक मार्गे येऊ नका अशी विनंती देखील केली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.