---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना महापौरांनी दिली दीड किलोची चांदीची तलवार!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरात युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुछ देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केल्यावर ते पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले. जळगावातील चौकाचौकात ठाकरेंचे भव्य स्वागत करण्यात आल्यानंतर ते आकाशवाणी चौकात पोहचले. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashri Mahajan) यांनी आदित्य ठाकरे यांना दीड किलो वजनाची चांदीची तलवार भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी तलवार कपाळाला लावत वंदन केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हात उंचावून जनसमुदायाला अभिवादन केले. Yuva Sena chief Aditya Thackeray was given a 1.5 kg silver sword by the mayor!

Aditya Thackeray mayor sword

शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले आहे. गेल्या आठवड्यातील दौरा प्रकृती अस्वस्थतेमुळे रद्द झाल्यानंतर शनिवारी आदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सकाळी जळगाव विमानतळावर युवासेना ग्रामीणतर्फे तर त्यानंतर अजिंठा चौफुली येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट चौक, शिरसोली रस्त्याने ते पाचोरा येथे जाणार आहेत. आकाशवाणी चौकात शिवसेनेतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

---Advertisement---
Gulabrao Deokar Aditya Thackeray 1
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना विजयी तलवार भेट देताना महापौर जयश्री सुनील महाजन.

आकाशवाणी चौक भगव्या रंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांचा ताफा पोहचल्यावर त्यांनी वाहनातून बाहेर येत सर्वांना हात उंचावून अभिवादन केला. आकाशवाणी चौकात लावण्यात आलेल्या व्यासपीठावर आल्यावर जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी दीड किलो वजनाची तलवार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना भेट दिली. प्रसंगी शिवसेना नेते आदेश बांदेकर, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकीर पठाण, मंगला बारी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा : धरणगावात गद्दारांचा जळफळाट, आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले !

तलवार स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सर्वांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर खाली बसून उपस्थित कार्यकर्त्यांचे हातात हात घेत त्यांनी हस्तालोंदन केले. जय भवानी, जय शिवाजी, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर ते पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/604326171317362

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---