⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मेहरूण तलावावर व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांचा हिसका

मेहरूण तलावावर व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांचा हिसका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले असून मेहरूण तलावाच्या काठावर विनापरवानगी तोंडाला मास्क न लावता व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.  एमआयडीसी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करीत ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोना असल्याने शासनाने विनाकारण फिरू नये असे आदेश केले आहेत. शासनाने निर्बंध लागू केलेले असताना देखील मेहरूण तलावावर काही तरुण तरुणी व्हिडीओ शूट करीत असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली असता त्यांनी याबाबत  एमआयडीसी पोलिसांना कळविले.

एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत व्हिडीओ शूटिंग करताना १) वृशाल नितीन राठोड (वय २० वर्ष रा.सुप्रीम कॉलनी नितीन साहीत्या नगर, जळगाव, मुळ रा.पळासखेड नाईक जिल्हा बुलढाणा) २) मनोज भिका जाय (वय-२० वर्ष रा.धोबी वराड ता.जि.जळगाव ३)सुरज रंज सोनार (वय १९ वर्ष रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी जळगाव), ४)अभिजीत रमेश चव्हाण (वय २५ वर्ष रा. सुप्रीम कॉलनी जळगांव ६) आनंद उर्फ गणेश सोमनाथ भोई (वय २१ वर्ष रा.जुने गाव मेहणबारे ता.चाळीसगांव जि. जळगांव), ६) सचिन चंद्रकांत भिडे (वय २३ वर्ष रा.मशिदीच्या मागे पिंप्राळा जळगांव), ७) गोपाल जगदीश राठोड वय १९ वर्ष रा.धोबी वराड ता.जि. जळगांव), ८) ईश्वर रोहीदास राठोड (वय २२ वर्ष रा.धोबी वराड ता.जि.जळगांव) ९) रीना यशवंत जाधव (वय २० वर्ष रा. शिवकॉलनी, जळगांव), १०) अंकिता शरद बोदडे वय २० रा.जामनेर आयटीआयजवळ राजा कौतिक नगर जि.जळगांव हे घटनास्थळी मिळून आले.

तरुण-तरुणींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून व्हीडीओ शूटिंग करतांना मिळुन आले असून त्यांनी सरकारी आदेशाची अवहेलना केल्याने एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी एक कॅमेरासह १० दुचाकी असा ४ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.