⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावात पुन्हा मर्डर : गोलाणी मार्केटमध्ये धारदार शस्त्राने भोसकून तरुणाची हत्या

जळगावात पुन्हा मर्डर : गोलाणी मार्केटमध्ये धारदार शस्त्राने भोसकून तरुणाची हत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२३ । शहरात खुनाचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसानंतर आज पून्हा खून झाला आहे. शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच आहे. जामनेर, यावल तालुक्यातील खून प्रकरण नंतर आज रविवारी रात्री पुन्हा एक खून झाला आहे. गेल्या तिन्ही खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये तळ मजल्यावर काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. रात्री १०.१५ च्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले आहेत. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हलविला असून मयताची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी घटनेचा साक्षीदार असलेल्या एकाला ताब्यात घेतले असल्याचे समजते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.