जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय आणि जळगाव सायबर क्राईम सेल यांच्यातर्फे “सायबर सुरक्षितता आणि जागरूकता” याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल तर प्रमुख पाहुणे सायबर क्राईम सेलचे पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाने होते.
यावेळी उपनिरीक्षक अंगद नेमाने यांनी जळगाव जिल्ह्यात झालेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत गुन्हेगार काय तंत्र वापरून कसे फसवतात याचे उदाहरण दिले. तसेच मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन अकाउंट आदीद्वारे विविध प्रकारे फसवणूक करण्यात येते. त्यांनी इंटरनेट, सायबर गुन्हेगारी म्हणजे नक्की काय ? युवकांनी या गुन्ह्यांच्या प्रभावापासून स्वत:चे कसे संरक्षण केले पाहिजे तसेच सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्याविरोधी असणारे शासनाचे कायदे, महाविद्यालयीन युवकांनी बाळगावयाची दक्षता या संबंधी विस्तृत आणि प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. ऑनलाईन फसवणूक, अश्लील चित्रफिती, खोटी वा चुकीची माहिती, जाणीवपूर्वक त्रास देणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा दुरुपयोग, बक्षिसांचे आमिष देणारे मेसेज, पोर्नोग्राफी अशा अनेक सायबर गुन्हे घडणाऱ्या बाबींची सविस्तर माहिती दिली. यावेळी कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे तरून पिढी कळत नकळतपणे सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकते. या संबंधात घ्यावयाची काळजी आणि दक्षता तसेच कायद्याचे स्वरूप यामुळे युवकांना सायबर गुन्हेगारीपासून आपला आणि आपल्या प्रियजनांचा बचाव कसा करता येईल याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले.
याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे ऍकेडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी अंगद नेमाने यांना सूचक प्रश्न विचारून मुलाखत वजा चर्चा केली. या प्रश्नांना नेमाने यांनी त्यांच्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत उत्तरे दिली. कार्यक्रमात सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रायसोनी इस्टीट्यूटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील व अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..