---Advertisement---
महाराष्ट्र गुन्हे बातम्या

कुटुंबासोबत जेवण करून रूममध्ये गेली अन्.. २५ वर्षीय तरुणीने उचललं नको ते पाऊल..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । हल्ली तरुण मुली मुलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस आत्महत्या सारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. मुळची हर्सूल येथील २५ वर्षीय तरुणीने राहत असलेल्या भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. मयुरी विलास मगरे असे मृत तरूणीचे नाव असून तिच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

mayuri magre

या घटनेबाबत असे की, मयुरी ही छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल या गावात राहत होती. मात्र, कामानिमित्त ती सिडको एन – ९ भागात भाडाच्या घरात राहायला गेली. मयूरी आधी हर्सूल गावात आपल्या घरी गेली. तेथे तिनं कुटुंबासोबत जेवण केले. जेवण केल्यानंतर ती सिडको एन – ९ भागातील तिच्या भाड्याच्या घरात आली.

---Advertisement---

भाड्याच्या घरात येत तिनं गळफास घेत आत्महत्या केली. शेजारच्या लोकांनी मयूरी खूप वेळ बाहेर आली नाही म्हणून कॉल केला. मात्र, मयूरीनं कॉल उचलला नसल्यामुळे त्यांनी दरवाजा ठोठावला. मयूरी दरवाजा उघडत नसल्याचं पाहता त्यांनी खिडकीतून पाहिले. तेव्हा तरूणीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

शेजारी राहणाऱ्या मुलीनं आरडाओरडा केला. नंतर याची माहिती तिनं घरमालकासह पोलिसांना दिली. सर्वांनी मयूरीला लटकेलल्या अवस्थेतून काढत घाटी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयूरीच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. मयूरीनं नक्की असं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment