जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील जगदंबा नगरात राहणाऱ्या ३४ वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली. चंद्रकांत सुकदेव वंजारी असे मृताचे नाव आहे.दरम्यान, चंद्रकांत वंजारी याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. मात्र, घटनेमुळे खळबळ उडाली.
अंतुर्ली येथील राहणार चंद्रकांत वंजारी या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी किशोर वंजारी यांच्या खबरीवरुन मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार उमेश महाजन करीत आहे.