Erandol : मासे पकडल्यानंतर घरी परतत काळाचा घाला ; अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

मे 17, 2025 7:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर परिसरात घडली. शरद रामा भिल (वय ४०, रा. कामतवाडी, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

vij jpg webp

शुक्रवारी (दि.16) रोजी शरद भिल हा सासऱ्यांकडे (लक्ष्मण श्रावण ठाकरे) खर्ची गावात आला असताना शनिवार (दि.17) रोजी दुपारी गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी सुकेश्वर शिवारात गेला होता. मासे पकडल्यानंतर घरी परतत असताना अचानक विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत शरदला तत्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या छातीवर आणि कानावर जखमा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी राजेश पाटील आणि महेंद्रसिंग पाटील यांनी पंचनामा केला असून एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment