⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | जळगाव हादरले ! आधी मारहाण केली नंतर तरुण शेतकऱ्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालविले

जळगाव हादरले ! आधी मारहाण केली नंतर तरुण शेतकऱ्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालविले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात धक्कादायक घटना घडलीय. येथे एका शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर चालवत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आधी मारहाण केली आणि मग शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवत ही हत्या केली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

दरम्यान, या घटनेतील दोषींवर कारवाई करावी याबाबत नातेवाईकांनी मयत शेतकऱ्याचा मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात नेल्याने खळबळ उडाली.

नेमकी काय आहे घटना?
मांडळ येथे भाल्या नाला परिसरात यवंत यशवंत कोळी यांची शेती आहे. ते रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने दिली. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेल्यावर थोड्या वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, “जयवंत यांना खोऱ्यानं मारहाण करून त्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवण्यात आले. शेतातून नेहमी वाळूचे ट्रॅक्टर जात असतात. ट्रॅक्टरमुळे भाऊच्या शेताची पाईपलाईन फुटून मोठे नुकसान सुद्धा झाले आहे. त्यांना बोलायला गेले असता ते दमदाटी करतात. याच वादातून काल रात्री दीड दोन वाजता, जयवंत हा शेतात असताना त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालविण्यात आले”, असा आरोप मयत जयवंत यांच्या भावाने केला आहे.

तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे दरम्यान, या घटनेतील दोषींवर कारवाई करावी याबाबत नातेवाईकांनी मयत शेतकऱ्याचा मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात नेला. नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन काही जणांना ताब्यात घेतले असून इतरांनाही अटक केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी जयवंत यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला. याचदरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.