जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । “मी ऑपरेशन ‘मौत’जवळ पोहचलोय…” अशा शब्दांत आपल्या प्रेयसीशी शेवटचा व्हिडीओ कॉल करत अहमदाबादमधील एका युवकाने अमळनेरातील एका लॉजमध्ये आयुष्याचा शेवट केला. सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुजरात राज्यातील सौरभ शर्मा याने गेल्या पाच ते सहा दिवसापासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम.पी. या मला या नावाने लॉजमध्ये रुम बूक केली होती.घटनेच्या आदल्या रात्री सौरभने लॉजमधील कर्मचा-यांना मला सकाळी उशिरा उठवा, असा निरोप दिला होता. १३ रोजी दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही. दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता त्याने गळफास घेतलेला आढळून आला.
सौरभवर गुजरातमध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. त्याने मृत्यूपूर्वी प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून मी ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचलो आहे असे म्हटले आहे. सौरभने त्याच्या डायरीत त्याला फसविलेल्या मुलीचा व तिच्या नातेवाइकांचा उल्लेख केला असल्याचे समजते. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.