fbpx

प्रेयसीचा साखरपुडा झाल्याच्या नैराश्यातून जळगावातील तरुणाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ ।  प्रेयसीचा साखरपुडा झाल्याच्या नैराश्यातून जळगावातील शिवाजी नगरातील दालफळ येथील एका २७ वर्षीय तरुणाने विष प्राशन घटना सोमवारी घडली होती. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.चिराग बाबूलाल पांडे (वय २७, रा. दालफळ, शिवाजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. 

याबाबत असे की, चिराग पांडे मोबाइल सिमकार्ड कंपनीत विक्री प्रतिनिधीचे काम करीत होता. चिराग याचे रतलाम येथील मुलीवर प्रेम होते. तिचा रविवारी साखरपुडा झाल्यामुळे त्याला नैराश्य आले. त्यातून त्याने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. चिंताजनक अवस्थेत नातेवाइकांनी सोमवारी दुपारी ४ वाजता त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी १२.२५ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी चिरागचे मित्र व नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली हाेती. चिरगच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुबीयांना माेठा धक्का बसला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज