---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

४ वर्षापूर्वी प्रेमविवाह, पत्नी मुलासह गेली माहेरी, सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । शिरसोली येथील तरुणाने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस येताच आणखी एका तरुणाने पत्नी आणि सासरच्या मंडळीमुळे गळफास घेत जीवन संपविले. तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहली असून त्यात पत्नी, सासू, सासरे, शालक यांना जबाबदार ठरविले आहे. गेल्या आठ दिवसापासून पत्नी फोन उचलत नव्हती तसेच मुलासोबत देखील बोलू दिले जात नसल्याचा चिट्ठीत उल्लेख आहे.

pankaj khachane jpg webp

जुने जळगाव परिसरातील गोपाळपुरा मागील भागात जुना आसोदा रोडवर पंकज उखर्डू खाचणे वय-२८ हा तरुण आजी, आई कल्पना, पत्नी चंचल, दीड वर्षीय मुलगा आणि लहान भावासह राहत होता. पंकज वेल्डींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत होता तर आई भाजीपाला विक्री आणि लहान भाऊ मुंबईत अप्रेंटीशीप म्हणून कामाला होता. पंकज तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत असताना त्याची ओळख भुसावळ येथील चंचलसोबत झाली होती. दोघांनी ४ वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना दीड वर्षीय मुलगा आहे. रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंकजने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी त्याची आई घरी आल्यावर कुणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी पहिले असता पंकजने आत्महत्या केल्याचे उघड झाले.

---Advertisement---

घटनास्थळी नातेवाईक आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रवींद्र पाटील व विजय निकम हे पोहचल्यावर त्यांनी पाहणी केली असता पंकजने लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली आहे. पंकजने सुसाईड नोटमध्ये सासरच्या मंडळींना आत्महत्येस कारणीभूत ठरविले आहे. त्याने चिट्ठीत, आत्महत्येस कारण की, माझा चार वर्षांपूर्वी चंचलसोबत प्रेमविवाह झाला होता. माझ्यात आणि पत्नी चंचलमध्ये नेहमी वाद होत होते, परंतु प्रत्येकवेळी चूक माझी नव्हती. माझ्या आत्महत्येला चंचल आणि तिचा भाऊ राहुल पांडव जबाबदार आहेत. चंचलचा भाऊ नेहमी घरी येऊन आम्हाला धमक्या देत होता. माझा सासरा पोलीस असल्याने ते पोलिसांच्या धमक्या देत होते. एकदा भुसावळ गेलो असता साला आणि सालीने मला खूप मारहाण केली. मी मेल्यानंतर माझा मुलगा माझ्या आईजवळ राहील हीच माझ्या आत्म्याला शांती असेल. दिवाळीच्या चार दिवसांपूर्वी चंचलच्या घरचे तिला घेऊन गेले ती येईल असे म्हटले पण ती काही आली नाही. मी चंचलला खूप फोन केले पण ती फोन उचलत नाही. माझ्या मुलाला दाखवत नाही. कोर्टाच्या धमक्या देतात. चंचल व तिचा भाऊ, आई, बाप यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतो आहे. चंचल तिच्या आईचे ऐकायची म्हणून आमचा संसार मोडला. असा चिट्ठीत उल्लेख करण्यात आलेला आहे.

मयत पंकजचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला असून त्याचा लहान भाऊ मुंबईहून जळगाव येण्यास निघाला होता. दरम्यान, पंकजचा मावस भाऊ जयेश पाटील याने दिलेल्या माहितीनुसार पंकजने काही मुलांकडून पैसे उधार घेतले होते. त्यापैकी ३० हजार त्याने परत देखील केले होते. तरीही ते मुले पंकजची दुचाकी घेऊन गेले होते. ते वारंवार पंकजला फोन करून पैशांसाठी त्रास देत असल्याचे जयेश पाटील यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---