गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात तरुणाचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । जळगाव शहरातील समता नगरातील एका विहीरीत २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोनू राजू बनसोडे (वय २७ रा. समता नगर, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव असून रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, शहरातील समता नगरातील बौध्द वाडा येथे आई व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला असलेला सोनू बनसोडे हा २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्रभर घरी न परतल्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध करण्यास सुरूवात केली. आज बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समता नगरातील बौध्दवाडा येथील विहिरीत चपला तरंगतांना दिसून आले.

त्यामुळे या ठिकाणी काहींनी गर्दी केली होती. या चपला सोनूच्याच आल्याचे त्याच्या आईने ओळखले. त्यानुसार पट्टीचे पोहणारा विहिरीत उडी घेऊन पहिल्याच प्रयत्नात सोनू याला बाहेर काढले. मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील तरूणांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सोनूने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची मोठी गर्दी होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button