जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । एका ३० वर्षीय युवक शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे उघडकीस आली. भैय्या राघो मोरे (वय – ३०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाही.या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे कि, खडकदेवळा येथील भैय्या मोरे या शेतमजुराने शिवारातील शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयत भैय्या राघो मोरे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक लहान भाऊ असा परिवार आहे.
भैय्या मोरे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे हे करत आहे. भैय्या मोरे याचे अकस्मात मृत्यूने खडकदेवळा व परिसरात शोककळा पसरली आहे.