---Advertisement---
चाळीसगाव

26/11 दहशतवादी हल्ल्यातील चाळीसगावच्या शहीदचा लहान भाऊ देशसेवेसाठी सैन्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । देशसेवा करत असताना २६ नोव्हेंबर २०२० रोजी श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावाचा सुपुत्र यश देशमुख शहीद झाले होते. दरम्यान, मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊ देखील सैन्यदलात भरती झाला आहे. एक मुलगा शहीद झाल्यानंतर दुसऱ्या मुलालाही देशसेवेसाठी पाठवणाऱ्या या माता-पित्याच्या व मुलाच्याही अनोख्या देशाप्रती असलेलं प्रेमाचं, देशभक्तींच कौतूक केलं नाही तर नवलच.

pimpalgaon jpg webp webp

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव या गावातील देशमुख कुटुंबियांची ही कहाणी आहे. वडील दिगंबर देशमुख हे शेती करतात. त्यांना दोन मुले व पत्नी असा त्यांचा परिवार होता. मोठा मुलगा यश हा सैन्य दलात भरती झाला. देशसेवा करत असताना यश हा जम्मू काश्मीर येथील 26/11च्या हल्यात शहीद झाला होता.

---Advertisement---

या घटने नंतर संपूर्ण चाळीसगाव परिसरात शोककळा पसरली होती. घरातील एखाद्या कर्त्या मुलाचा मृत्यु झाल्यानंतर कदाचित कोणतीही माता आपला दुसरा मुलगा देशासाठी देण्यासाठी सहजांसहजी तयार होणार नाही. मात्र आपल्या मोठ्या मुलाचे देश सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरेखा देशमुख या आईने आपला लहान मुलगा पंकज देशमुख याला ही सैन्य दलात भरती केले आहे.

पंकजच्या आईने काळजावर दगड ठेवत पहिल्या मुलाच्या पाठोपाठ दुसरा मुलगा पंकजला देखील देशाच्या सेवेसाठी समर्पित केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या पंकजला इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अनेक कंपन्यांकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर्सही मिळाल्या. मात्र, मोठ्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सैन्य दलात जाण्याचा त्याने निर्णय घेतला आणि तो सैन्य दलात भरती सुध्दा झाला.

पहिला मुलगा शहीद झाल्यानंतर दुसऱ्या मुलालाही देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या त्या मातेला काय म्हणावं, तिच्यापुढे शब्दसुध्दा अपूरे पडतील. विशेष म्हणजे शहीद यश देशमुख याचे प्रशिक्षण ज्या ठिकाणी झाले होते. त्याच बेळगावात पंकज देशमुख सैन्य दलाचे प्रशिक्षण घेणार आहे. या प्रशिक्षणासाठी पंकज नुकताच बेळगावला रवाना देखील झाला आहे. त्याला निरोप देतांना कुटुंबियांच्या भावना दाटून आल्या होत्या. मात्र, “यशचे स्वप्न पूर्ण कर, तुझा एक भाऊ आणि माझा एक मुलगा गेला म्हणून काय झाला, सैन्य दलात जेवढे जवान आहेत, ते सर्व माझे मुले आहेत,” असे म्हणत सुरेखा देशमुख यांनी अश्रूंना आवर घालत पंकजला मोठ बळ दिलं.

पंकज देशमुख याने इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले आहे. खरंतर तो चांगली नोकरी मिळवून आरामात आयुष्य जगू शकला असता, परंतु मोठ्या भावाच्या पावलांवर पाऊल टाकत त्याने देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे त्याची आई सुरेखा देशमुख यांनी पहिल्या मुलाच्या पाठोपाठ दुसऱ्या मुलालाही देशासाठी समर्पित केलं. सुरेखा देशमुख या वीरमातेच्या देशभक्तीला, देशप्रेमालाही मनापासून सलाम. तर दुसरीकडे वीरमाता सुरेखा देशमुख यांनी आजच्या पिढीतील इतरांसमोर देशप्रेमाचाही मोठा आदर्श ठेवला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---