मला तुम्ही राजकारणातून कधीच संपवू शकणार नाही – देवेंद्र फडणवीस
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेले भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी फडणवीस म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करतात. पण २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थानप केली तेव्हा त्यांनीदेखील आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता.
याच बरोबर फडणवीस म्हणले कि, उद्धव ठाकरे एका महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या, असे आव्हान देत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवून नंतर आमची साथ सोडली तेव्हा त्यांनी राजीनामा का दिला नाही?
शेवटी जे नशिबात लिहलेलं असतं, तेच होतं. तुम्ही २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही तिघांनी मला संपवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत, पण ते यशस्वी झाले नाहीत. भविष्यात देखील तुम्ही मला संपवू शकणार नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हटले.