जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२३ – नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखरसंस्था. प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा म्हणजे परिषद. अशा ह्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने नटराज पॅनल ‘रंगकर्मी नाटक समूह’ हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पॅनलच्या वतीने रविवारी (दि.26) रोजी नाशिक येथील कालिदास नाट्यगृहात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पॅनल प्रमुख अभिनेते प्रशांत दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत जळगाव येथील पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेश जगन्नाथ शुक्ल यांचे नाव जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी नाशिक नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनिल ढगे, सहकार्यवाहक विजय शिंगणे, खजिनदार ईश्वर जगताप, नाट्यसेवाचे प्रमुख राजेंद्र जाधव, नाट्य परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके, अहमदनगर नाट्य परिषद महानगरचे क्षितिज झावरे, संगमनेर नाट्य परिषदेचे संजय दळवी, धुळे नाट्य परिषद उमेदवार चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.