⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | आरोग्य | होय, तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचा मूड बदलू शकता, कसे जाणून घ्या?

होय, तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचा मूड बदलू शकता, कसे जाणून घ्या?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । आपल्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. सध्या धावपळ करत एकाच वेळी अनेक काम करण्याचे कसब देखील मिळवले आहे. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतर तुम्हाला कोणीही काहीही मदत करू शकत नाही. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा.

आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे. काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात.

जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो. तुम्हाला वाटेल खरंच हे शक्य आहे का? मी हे पाहिलंय माझ्या ग्राहकांवर हे आजमावले आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे आनंदी जीवनाचं रहस्य.

उगवत्या सूर्याकडे बघा : होय, उगवत्या सूर्याकडे बघितल्याने तुमचा मूड बदलू शकतो. झाडांच्या पानांवर पडलेले सूर्य किरणे जे इंद्रधनुष्य निर्माण करतात. तसेच विविध रंगांच्या फुलांवरील सूर्य किरणे पहावी. सकाळी-सकाळी होणारा पक्षांचा किलबिलाट ऐकावा. यावेळी नैसर्गिक उजेडात एक स्मित हास्य देऊन सेल्फी काढा. या नैसर्गिक वातावरणात तुमच्यामध्ये उच्च ऊर्जा निर्माण होईल. हा आवाज खूप साधा आहे पण नेहमी साध्या गोष्टी चांगला परिणाम करतात.

चालायला जा, धावा, : धावायला जा. यावेळी तुमच्या सोबत पाण्याची बाटली, मास्क, ठेवा. पार्कमध्ये नैसर्गिक वातावरणात धावा. जेथे पक्षांचा किलबिलाट असेल. संशोधन सांगते की, हिरवेगार वातावरण तुमच्यामध्ये हार्मोन बदल करतात.

लहान मुलांबरोबर खेळा : लहान मुलांचं हास्य निखळ असते. त्यांना मिठी मारणं, त्यांच्यासोबत खेळणं. यामुळे तुमच्यामध्ये ऑक्स्ट्टोसिन नावाचे संप्रेरक निर्माण होते. जे तुमच्या मनावरील ताणाव दूर करते. तुमच्या भावना यामुळे चांगल्या व्यक्त होऊ लागतात.

तुमच्या आवडीचे काम करा :
आपल्या वेगवेगळ्या आवडी असतात जसे पोहणे, वाचणे, खेळणे, चित्र काढणे, फोटोग्राफी यामुळे तुम्ही निवांत वेळ घालवता आणि थकवा दूर होण्यास मदत होते. तर तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्याने तुम्ही आनंदी राहता. यामुळे हार्मोन्स निर्माण होण्यास मदत होते.

योगासन करा : योगासांमुळे तणाव दूर होतो हे सिद्ध झालं आहे. यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टींबद्दल धन्य असता. जीवनात तुम्हाला काय हवे आणि काय नको यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं असतं. याचा तुम्हाला दुहेरी फायदा होतो. एक तर तुमचा तणाव दूर होतो आणि सकारात्मकता निर्माण होते.

अन्नातून सेरोटोनिन वाढवा :
सेरोटोनिन या संप्रेरकांमुळे तुमचा मूड चांगला होऊन आनंदी राहतो. तर तुम्ही तुमच्या जीवनातून देखील शरीराला सेरोटोनिन मिळवून देऊ शकता. यामध्ये बिया वर्गीय धान्य, प्रोटीन, मांसाहार तसेच इतर आहारातून तुम्ही सेरोटोनिन मिळवू शकता.

तसेच काही तेलांचा मसाज करण्यासाठी वापर केल्याने देखील शरीराला शांती मिळण्यास मदत होते. यामुळे हार्मोन निर्माण होऊन मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहते. यासाठी तुम्ही लोह देणारे लिंबूवर्गीय फळ खाऊ शकता.

निसर्ग आपल्याला खूप काही देतो. नैसर्गिक आणि साधी जीवन पद्धती एक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळवायचं असेल तर इतर पर्यायांपेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि तुमच्या मनस्थितीला पुन्हा परत आणणे फायदेशीर ठरू शकते. हे नेहमी लक्षात ठेवा की, केवळ तुम्ही स्वतः मला आनंदी ठेवू शकता इतर कोणीही नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.