जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । राज्यातील काही ठिकाणी सध्या पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली.आता मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून अशातच पुणे हवामान खात्याने राज्यात पुढील चार-पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यात आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार, पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाडा अन् इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात आज जळगाव जिल्ह्याला देखील अलर्ट जारी केला आहे.
पुढचे 4,5 दिवस राज्यात पावसाचे …☔☔
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 13, 2023
कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भ काही ठिकाणी 🌧मुसळधार, मराठवाडा व इतर काही भागात🌩 मेघगर्जनेसह पाउस. pic.twitter.com/jQms4F2WBz
दरम्यान,मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. जळगावमध्ये तीन ते चार दिवसानंतर पावसाची उसंत घेतली असून निरभ्र आकाश असून आज सकाळी सूर्यदर्शन झाले आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत जिल्ह्यात ७५ पेरण्या झाल्या आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला नाहीय. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पामधील जलसाठ्यात इंचभरही वाढ झालेली नाहीय.
जळगांव जिल्हा दि14/ 07/2023
पाचोरा-28
पारोळा-18
जामनेर-1
चोपडा-7
चाळीसगाव-17
रावेर-12
मुक्ताईनगर-6
एरंडोल-2
जळगाव-4