जळगाव लाईव्ह न्यूज | २ मे २०२१ | यावल ग्रामीण भागात पातळीवर सुरू कोरोनाचा संसर्गा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्षात घेता आरोग्य उत्तम यंत्रणाही अधिक सर्तक व सज्ज झाली असून या दृष्टीकोणातुन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडसीम अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र कोळवद येथे उपकेंद्र स्थरावर कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणास आज प्रारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, सरपंच याकुब तडवी, उपसरपंच शशिकांत चौधरी, सामजिक कार्यकर्ते अतुल भालेराव, वैद्यकीय अधिकारी डाँ नसीमा तडवी कोतवाल, ग्रापंचात सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, फत्तु तडवी आदि उपस्थित होते.
प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा कोईराला महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ नसीमा तडवी, डॉ गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी ४५वर्षावरील ३० नागरिकांना कोवीड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. कोळवद व सातोद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ साजिद तडवी, डॉ राहूल गजरे, आरोग्यसेविका मेहमूद तडवी, आरोग्यसेवक भूषण पाटील, आशा सेविका छाया वाघुळदे, उषा कोळी, सरला गुंजाळ व सायरा तडवी यांनी यशस्वीपणे नियोजन केले.