---Advertisement---
यावल राजकारण

यावल बाजार समितीत महायुती पॅनलचा विजय ; अमोल जावळे यांची सहकारात दमदार एन्ट्री

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२३ । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या मतमोजणीत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. महायुतीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय संपादन करून एकहाती वर्चस्व संपादन केले.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेना व रिपाइंला सोबत घेऊन सहकार पॅनलची निर्मिती केली होती. यात प्रामुख्याने तरूण आणि अनुभवी यांचा मिलाफ साधण्यात आला होता. ना. गिरीश महाजन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे व अमोल हरीभाऊ जावळे यांनी पॅनलचे नेतृत्व केले होते. तर महाविकास आघाडीतर्फे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी धुरा सांभाळली होती.

माजी खासदार, माजी आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांनी यावल बाजार समितीमध्ये 18 पैकी १५ जागा जिंकून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला. अमोल जावळे हे मितभाशी संयमी व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून सर्व जिल्ह्यात परिचित आहेत. जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेमध्ये अमोल जावळे यांनी अतिशय संयमीपणाने आपल्या सूक्ष्म नियोजनाच्या आधारावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावित दुध संघामध्ये भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आता यावल बाजार समितीमध्ये ही जावळे यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केले आहे. जळगाव जिल्ह्यात बाजार समितीचे निकाल हे उलट सुलट येत असताना दिवंगत राजकीय नेत्याचा वारसदाराची वाटचाली आशादायक दिसत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---