⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

यावल पंचायत समितीला हवे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने विविध विकास कामांचा गोंधळ उडाला आहे. सरपंच व इतर लोकप्रतिनिधींना कामे करणे अवघड झाले आहे.

तत्कालिन गटविकास अधिकारी निलेश पाटील यांची कळवण येथे सहा महिन्यांपूर्वी बदली झाली. तेव्हापासून यावलला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळालेले नाहीत. जागा रिक्त असल्याने आधी विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला. नंतर डॉ. मंजुश्री गायकवाड, परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नेहा भोसले व नंतर पुन्हा प्रभारी म्हणून डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्याकडे पदभार देण्यात आला. मात्र, कायमस्वरूपी अधिकारी मिळाले नाहीत. परिणामी कामांचा खोळंबा झाला आहे.