नागरिकांच्या निवेदनाकडे यावल पालिकेचे दुर्लक्ष, युवक काँग्रेसने घेतली दखल
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथे मोकाट डुकरांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून त्याची तक्रार २४ मार्च रोजी नगरपालिकेकडे नागरिकांनी केली होती. ज्यात महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत औद्योगिक नगरी सन १९६४ चे कलम २९४ पोट कलम १,२,३, चा नागरिकांनी उल्लेख केला होता. परंतु नागरिकांच्या या निवेदनाकडे पालिकेने दुर्लक्ष करून कारवाई केली नव्हती.
आज दिनाक २९ मार्च रोजी युवक काँग्रेसतर्फे त्याची दखल घेण्यात आली. युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी यावल नगरपालिकेला निवेदनाद्वारे विचारना केलीय. त्यात नागरिकांनी दिलेले निवेदनावर व त्यात नमूद केलेले कायदा वर आता पर्यंत अमलबजवणी का झाली नाही? व ते केंवा होणार व अमलबजावणी करतांना का अडचणी येत आहे. अमलबजावणी करण्यावर कोणताही राजकीय व सामाजिक दबाव आहेत का त्याचा उत्तर नागरिकांनी देयावा असा प्रश्न युवक कांग्रेस रावेर यावल विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी निवेदाद्वारे यावल नगर पालिकेला केले आहे.