⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | Xiaomi च्या स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; इतके स्वस्त फोन.. खरेदीची संधी सोडू नका!

Xiaomi च्या स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; इतके स्वस्त फोन.. खरेदीची संधी सोडू नका!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२३ । तुम्ही देखील नवीन Xiaomi चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच Amazon India वर Xiaomi Super Saver सेल सुरू आहे. या सेलमध्ये Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन्सवर 38,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

याशिवाय, Xiaomi च्या सुपर सेव्हर सेलमध्ये डिव्हाइसेसवर जबरदस्त बँक सवलत देखील दिली जात आहे. इतकेच नाही तर या सेलमध्ये तुम्ही आकर्षक एक्सचेंज ऑफरसह Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन देखील खरेदी करू शकता. कंपनी हे स्मार्टफोन्स मोठ्या विनाखर्च EMI वर खरेदी करण्याचा पर्याय देखील देत आहे. चला तर मग जाणून घेऊया Xiaomi सुपर सेव्हर सेलच्या टॉप 3 डील्सबद्दल जे 14 जूनपर्यंत चालणार आहे.

Xiaomi 12 Pro
12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 84,999 रुपये आहे. सुपर सेव्हर सेलमध्ये फोनची किंमत 42% डिस्काउंटनंतर 48,999 रुपये झाली आहे. फोनवर 2,000 रुपयांपर्यंतची बँक सवलतही दिली जात आहे. या दोन्ही ऑफरसह, फोनवर उपलब्ध एकूण सूट 38,000 रुपयांपर्यंत जाते. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही फोनची किंमत 24,800 रुपयांनी कमी करू शकता. Xiaomi च्या या फोनमध्ये 6.73 इंचाचा WQHD+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे तीन बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये दिलेली बॅटरी 4600mAh आहे, जी 120W चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi K50i 5G
सेलमध्ये Redmi च्या या फोनवर जोरदार डील दिली जात आहे. यामध्ये हा फोन 34% डिस्काउंटनंतर उपलब्ध आहे. या सवलतीनंतर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 31,999 रुपयांवरून 20,999 रुपयांवर आली आहे. ICICI बँक कार्डने पेमेंट करणार्‍या वापरकर्त्यांना 1500 रुपयांची सवलत देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये फोनवर 19,949 रुपयांपर्यंतची अतिरिक्त ऑफर देखील दिली जात आहे. Redmi चा हा फोन MediaTek Dimension 8100 चिपसेट वर काम करतो. त्याचा डिस्प्ले 6.6 इंच आहे, जो 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनचा मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे.

Redmi Note 12 5G
4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 19,999 रुपये आहे, परंतु डिस्काउंटनंतर हा सेल 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही फोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करू शकता. बँक ऑफर SBI आणि ICICI बँकेच्या कार्डधारकांसाठी आहे. कंपनी या फोनवर 16,149 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर 48-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.