---Advertisement---
जळगाव जिल्हा

.. तर आपण लोकसभा निवडणूक लढणार ; पैलवान विजय चौधरी राजकारणाचा आखाडा गाजवण्याच्या तयारीत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । ट्रिपल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) असलेला पैलवान विजय चौधरी (Vijay Chaudhari) कुस्तीच्या आखाड्यानंतर आता राजकारणाचा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. आपण राजकारणाचा आखाडा गाजवण्याच्या तयारीत असल्याचे खुद्द विजय चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

vijay chaudhari jpg webp

विजय चौधरी यांना राजकारणात कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? यावर बोलताना सांगितले की, अद्याप कुठल्याच पक्षाची आपणास ऑफर नाही. मात्र भारतीय जनता पक्ष (BJP) आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे, असे ते म्हणाले

---Advertisement---

विजय चौधरी यांचं चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे गाव आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात जर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव लोकसभेत सध्या भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यामुळे विजय चौधरी जळगाव लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजय चौधरी यांची २०१७ मध्ये राज्य सरकारकडून पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी कुस्तीच्या आखाड्यानंतर आता राजकारणाचा आखाड्यात उतरत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---