⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

चिंताजनक ! जिल्ह्यातील ६७ जलप्रकल्पांतील उपयुक्त साठा शून्यावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ ।  यंदाचा मान्सून चांगलाच लांबत चालल्याने जिल्ह्यातील नागरीकांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. ६७ जलप्रकल्पांतील उपयुक्त साठा शून्यावर आला आहे. तसेच गिरणा, हतनूर व वाघूर या मोठ्या प्रकल्पांतील साठाही ओसरत चालला आहे.

सध्या गिरणा धरणात २३.२३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर हतनूरमध्ये ४० आणि वाघूर धरणात ६१ टक्के साठा आहे. बोरी, भोकरबारी, अग्नावती व हिवरा या मध्यम प्रकल्पांतील जलसाठाही पूर्णतः आटला आहे. बहुतांशी लघुप्रकल्पांतील उपयुक्त साठा आटला आहे.

केवळ सातगाव, गोंदेगाव हातगाव, चितेगाव, कोदगाव, चिंचाटी, लोहारा (रावेर), वड्री शिल्लक (पाचोरा), शेवगा, पिंप्री, गोद्री, सूर जामडी, मुंदखेडा, ओढरे वाघझिरा, हरीपुरा (यावल) या (जामनेर), चारठाणा (मुक्ताईनगर). (चाळीसगाव), गंगापुरी, मात्रणनाला, लघुप्रकल्पांत काहीसा साठा शिल्लक आहे.

या प्रकल्पांतील उपयुक्त साठा शून्यावर

गिरणा धरणातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पिण्यासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे नाले, बंधाऱ्यांमध्ये जलसाठा शिल्लक आहे. म्हणूनच पाचव्या आवर्तनाची मागणी नोंदविली गेलेली नाही. हा साठा संपल्यावर जून अखेरीस गिरणा धरणातून पिण्यासाठी पाचवे आवर्तन सोडले जाण्याची शक्यता

कोरडेठाक प्रकल्प

बोरी, भोकरबारी, अग्नावती, हातगाव, खडकेसीम, वाघळा, ब्राह्मणशेवगा, पिंपरखेड, कुंझर, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळीभोरस, पथराड, कृष्णापुरी, निसर्डी, आर्डी, म्हसवे, कंकराज, शिरसमणी, पिंपळकोठा भोलाणे, सावरखेडा, बोळे, मन्यारखेडा, विटनेर, पद्मालय, खडकेसीम, गाळण, बदरखेडा, गारखेडा, सारखे, म्हसळा, बांबरुड. लोहारा, वाकडी, बहुळा, पिंपळगाव हरेश्वर, कळमसरा, चिलगाव, बिलवाडी, भागदरा. साळशिगी. जुनोना, चारठाणा, चिचपाणी, विटने नशिराबाद, शिरसोली, गोगडीनाला, देव्हारी, सुनसगाव, उमरदे आदी आहे. हा साठ आठवडाभरात पूर्णतः आटेल, अर्श माहिती सूत्रांनी दिली