⁠ 
शनिवार, मे 4, 2024

चिंताजनक बातमी ! राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊसच नाही

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | संपूर्ण देशात यंदाचा पावसाचा अंदाज चांगला असला तरी अद्याप मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. भारतातील ९ टक्के भागात हा पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रातील ११ जिल्हात हा पासून झालेला नाही तर देशातील तब्बल ६६ जिल्ह्यात हा पासून झालेला नाही.

या गांभीर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल ३१% जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सूनपूर्व पावसाची कमतरता दिसून येते, तर बाकी २१% कमी आहेत, असे २३ मे पर्यंतच्या IMD डेटामधून समोर आलं आहे.

या महिन्यात प्रायद्वीप आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी, मध्य भारतामध्ये आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये फारसा पाऊस झाला नाही. इतकंच नाहीतर भारतातील जवळपास ६६ जिल्हात हा पाऊस झालाच नाही

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने पुढच्या महिन्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जमीन तयार करण्याच्या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. २७ मे पर्यंतच्या IMD च्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोरड्या हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या कमतरतेमुळे खरिपाच्या तयारीला फटका बसू शकतो.