जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । सध्या कोरोनाची लाट नसली तरी कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. अलीकडेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) ने घोषणा केली होती की, कोविड-19 महामारी आता आरोग्य आणीबाणी नाही.
मात्र, आता याच दरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे (WHO) प्रमुख डॉ. ट्रेडोस गेब्रेयसस यांनी इशारा दिली आहे की, जगाने पुढच्या महामारीसाठी तयारी करावी, जी कोविड-19 साथीच्या आजारापेक्षा जास्त घातक असू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस गेब्रेयसस म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही घातक असलेल्या व्हायरससाठी तयार राहायला हवे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी 76 व्या जागतिक आरोग्य संमेलनात आपला अहवाल सादर करताना हे सांगितले.
ते म्हणाले की, कोरोनामुळे किमान 2 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच डब्ल्यूएचओने घोषणा केली होती की, कोविड-19 महामारी आता आरोग्य आणीबाणी नाही. टेड्रोस यांनी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आरोग्य परिषदेत सांगितले की, पुढील साथीच्या रोगाला रोखण्यासाठी चर्चा करण्याची वेळ आली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही.