कला आणि अर्थकारणाचा ताळेबंध जुळवणे म्हणजेच यशस्वी फोटोग्राफर- रितेश सावरकर

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल येथे यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशन तर्फे संपन्न झालेल्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त प्रोफेशनल फोटोग्राफीचे अर्थकारण :- समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन पर व्यावसायिक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया यावल शाखा व्यवस्थापक रितेश सावरकर सर व बिजनेस कोच म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता पाटील (जळगाव) हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दीपक बडगुजर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख सर यांनी पार पाडले प्रफुल्ल नेहते यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

रितेश सावरकर सरांनी फोटोग्राफी क्षेत्रातील आर्थिक नियोजनाची तसेच बँकिंग व्यवहाराविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या बँकिंग क्षेत्रातील विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थित सर्व फोटोग्राफर बांधवांना दिले. इन्कम टॅक्स रिटर्न आणि आपला सिबिल याविषयी मो मोलाचे मार्गदर्शन केले. दत्ता पाटील यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील आर्थिक गणिते पैसा उभारणे ते तो इन्व्हेस्ट करणे यात येणाऱ्याविविध समस्या व त्याचे निराकरण कसे केले जाईल आणि फोटोग्राफरांचा बँकिंग क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन भविष्याच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण पाहिजे याचे महत्त्व समजून सांगितले.

तसेच या कार्यक्रमांमध्ये नवीन कार्यकारणीची निवड ही करण्यात आली नवीन कार्यकारिणीनुसार हेमराज पाटील (स्वराज्य प्रोडक्शन) यांची अध्यक्ष म्हणून तर मनोज होले व मुकेश बारी यांची उपाध्यक्ष व पवन कोळी यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.. तर शैलेश पवार, रोहिदास कोळी, देवा सपकाळे, राहुल देशमुख, महेश नन्नवरे, नितीन कोळी, मोहित सपकाळे या सर्वांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.




