३५ वर्ष सतत संघर्ष करून शिवसेना वाढीसाठी काम केले – गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । मी टीका करणाऱ्यांना नेहमीच विकास कामाच्या माध्यमातून उत्तर देत असतो. लोकांचा आणि गावाचा विकास व्हावा हे माझे ध्येय आहे. त्यामुळे लोकांसाठीच मी काम करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
दिवाळीनिमित्त साळवा येथे झेंडा चौक येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले, ३५ वर्ष सतत संघर्ष करून शिवसेना वाढीसाठी काम केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ध्येय व धोरणे टिकविण्यासाठी आम्ही उठाव केला आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व जोपासण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला झाला आहे कामाला सुरुवात झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ४.३२ कोटीची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्रामपंचयातीजवळील लहान पुलाचे काम नाबार्डमधून मंजूर करणार असून स्मशान भूमीलगत शेत रस्त्याचा काम, तसेच साळवा ते पष्टाणे रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असून, साळवा व परिसराचा बॅक लॉग भरून काढणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.