‘त्या’ पुलाचे काम लवकरच : आमदार किशोर पाटील

मार्च 28, 2022 11:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । भडगाव तालुक्यात एकूण चार ठिकाणी पुल मंजुर केले असून त्यापैकी दोन पुलांचे काम सुरू आहे. भडगाव शहरातील जुने मटन मार्केट ते पेठ भागाला जोडणाऱ्या पुलाचे ही लवकरच टेंडर होऊन काम सुरू होईल. तर शहरासाठी बंधाऱ्यासह पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले. ते गिरणा नदी पुलांच्याभूमिपुजन प्रसंगी बोलत होते, हा पुल 12 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

devlopment jpg webp

आमदार पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यात गिरणेवर फक्त भडगाव व गोडंगावला च पुल होते. त्यामुळे लोकांना मोठ्या फेर्याने जावे लागायचे. हे हेरून मी गिरणा नदिवर पुलांची संख्या वाढविण्याच्या निश्चय केला. त्यानुसार गिरणेवर पाढरंद ते निंभोरा दरम्यान पुलाचे काम सुरू आहे. तर भडगाव ते वाक दरम्यान कामाचे आज भुमिपुजन होऊन प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. जुने मटन मार्केट ते पेठ भागाला जोडणारा पुलाला ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच टेडंर प्रक्रीया होईल. याशिवाय गुढे ते नावरे पुलांच्या कामाचे ही टेडंर प्रक्रीयेत असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच भडगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे लवकरच तिला मंजुरी मिळेल. त्यात गिरणेवर बंधारा ही होणार आहे. या पुलाला दिड वर्ष कामाची मुदत आहे. मात्र पुढच्या वर्षभरात या पुलाची काम पुर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष शशीकांत येवले, प्रशांत पवार, अतुल पाटील, माजी नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, युवासेना जिल्ह्यासरचिटणीस लखीचंद पाटील, शिवसेना शहर प्रमुख योगेश गंजे, आबा चौधरी, मनोहर चौधरी, इम्रान सैय्यद, माजी सभापती रामकृष्ण पाटील, रावसाहेब पाटील, वडजी राजेंद्र मोरे, शिंदिचे अनिल पाटील, कोठलीचे विनोद पाटील, जगन्नाथ भोई, राजेंद्र आचारी, संतोष महाजन, संजय सोनवणे, नागेश वाघ, डॉ.विलास पाटील, सचिन मोरणकार, रतन परदेशी स्वीय सहाय्यक राजेश पाटील, युवराज सूर्यवंशी, निलेश पाटील, शंकर मारवाडी, जे.के. पाटील, काँट्रॅक्टर संजय निंबाळकर, निलेश पाटील माजी उपसभापती राजेंद्र लालचंद परदेशी उपस्थित होते.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now