⁠ 
रविवार, मे 19, 2024

महिलादिन विशेष : सौ. शोभा अरविंद देशमुख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाणी टंचाईच्या काळात मोडले मंगळसूत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । जीएम फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरातील गरजू रूग्णांना आवश्यक ती आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे काम मी करत असतो. त्यामुळे माझा एक पाय जामनेर-जळगाव तर दुसरा पाय मुंबईत मुंबई-नाशिक-असतो. माझ्या कामातील जनसेवेचे हेच व्रत पत्नी सौ. शोभाने पहूर गावात स्वीकारले आहे. ती २०१२ मध्ये ग्राम पंचायत सदस्य होती. जमेल त्या पद्धतीने अडलेल्या-नाडलेल्या लोकांना ती आज सुद्धा मदत करीत असते.

सौ. शोभाविषयी एक आठवण सांगायलाच हवी. पहूर ग्रामपंचायतीची निवडणूक आटोपली आणि सन २०१२ मध्ये गावात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. अक्षरशः बादली-हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत होते. अशावेळी पाण्याचे टॕन्कर मागवून पाणीपुरवठा करणे हाच पर्याय होता. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती. त्यामुळे सदस्यांनाच पदरचा पैसा खर्च करून व्यवस्था लावणे भाग होते.

अडचणी सांगून येत नाहीत. एक समोर असली की दुसरी उभी राहते. परीक्षेचा काळ असाच आसतो. आम्ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या तेव्हा अडचणीत होतो. आपापल्या वॉर्डात किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करणे ही जबाबदारी होती. टॕन्करचा खर्च करावाच लागणार होता. अशावेळी सौ. शोभा मला म्हणाली, ‘लोक आपल्या भरवशावर आहेत. इतर सदस्य पिण्याच्या पाण्याची वेवस्था करित आहे. आपणही काही तरी व्यवस्था करायला हवी. आपली सुद्धा अडचण आहेच. तुम्ही असे करा हे माझे सोन्याचे मंगळसूत्र व इतर दोन-तीन दागिने मोडून टाका. येईल त्या पैशांत लोकांना पाणी देऊ.’

घटना होऊन सात-आठ वर्षे झाले. पण आजही सौ. शोभाचे ते म्हणणे कानात ऐकू येते. अंगावर काटा येतो. समाजसेवेचा वसा घेतलेली पत्नी प्रसंगी आपले स्त्रीधन मोडू शकते याचा मला अभिमान तर वाटलाच पण तेव्हा लक्षात आले की महिला जर कणखर असली की ती आपले कार्य पूर्ण करायला माणसापेक्षाही धाडसी निर्णय घेऊ शकते. माणसापेक्षा ती नक्कीच काकणभर सरस असते. आम्ही सोने मोडून दोन लाख रूपये मिळविले. गावात टॕन्करने पाणी पुरवठा सुरू केला. कानोकानी हा विषय माध्यमात पोहचला. झी २४ तास, आयबीएन लोकमत, टीव्ही ९ अशा सर्वच चैनलवर बातम्या झळकल्या. सुदैवाने अंदाजानुसार पाणीटंचाई नियंत्रणात आली.

मुलांच्या शिक्षणामुळे आमचा निवास गरजेनुसार पहुर -जळगाव असा असतो. तरीही गावातील संपर्क व स्नेह कायम आहे. भारतमाता पतसंस्था, भारतमाता महिला बचत गट यांच्या माध्यमातून महिलांना स्वयं निर्भर करण्याचे काम आजही अविरतपणे सुरू आहे. कन्या बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षाला तर मुलगा सिव्हील इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला आहे. मुलांच्या प्रगतित फक्त सौ. शोभा यांचा सिंहाचा वाटा आहे.

(अरविंद देशमुख, पहुर, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group