---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा

महिलादिन विशेष : सौ. प्रीती स्वानंद झारे

---Advertisement---

वेळेनुसार नियोजन करणारी परफेक्ट वुमेन

womens day special preeti swanand zare jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । सौ. प्रीती स्वानंद झारे या स्व. अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडियम शाळेची २०१२ पासून मुख्याध्यापिका आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या माध्यमातून विद्यार्थी विकसित व्हावेत यासाठी सतत कल्पक कार्यक्रमांचा विचार करुन सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते. घरातील जबाबदारी असो किंवा आप्त स्वकीयांकडील कार्यक्रम, प्रीती नेहमीच आपण काय मदत करु शकू असा विचार करते. बँक आणि संघ कामाच्या धावपळीत मला तितकासा वेळ मिळत नाही.

---Advertisement---

आमच्या लग्नाला आता १८ वर्ष झाली पहिल्यापासून असंच आहे पण या सगळ्या कालावधीत मुलांकडे लक्ष देणे आणि तिचे व्याप पण ती सहजतेनं सांभाळते. २००५ सालापासून आकाशवाणी जळगाव केंद्रात विविध कार्यक्रमात पण सहभागी होते. आता जमेल तेव्हा उद्घोषिका म्हणून काम करते. सूत्रसंचालन, अभिवाचन आणि काव्यवाचनाची आवड आहे. या क्षेत्रात तिने स्वतःचा ठसा उमटवला आहे. कौटुंबिक कठीण प्रसंग आले पण ती सोबत असल्याने त्यातूनही बाहेर पडलो.

आमचं एकमेकांशी होणारे शेअरींग आणि ट्युनिंग खूप जुळणारे आहे. दोन ध्रुव कधी होत नाही. सामाजिक काम करतांना घरातील गृहिणीची साथ फार मोलाची असते. आमच्या कौटुंबिक कठीण प्रसंगात असून देखील आम्ही कार्यकर्त्यांच्या समस्या समजून यथाशक्ती मदत करु शकलो. संघ कामाच्या व्यस्ततेने सुटीच्या दिवशी अनेक वेळेस कुटूंबाला वेळ कमी मिळतो, पण माझ्या उपलब्ध असलेल्या वेळेचं नियोजन प्रीती एकदम बरोबर करते. तिचे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्याचे अनेक वेळा मला आश्चर्य देखील वाटते. पत्नी असली तरी आमच्यातील मैत्री पण तेव्हढीच पक्की आहे. पती-पत्नीतील विरोधी मतांची अनूभूती आमच्या नात्यात त्यामूळे कधी आलीच नाही…आणि येणार ही नाही. शिक्षक प्रशिक्षण सतत चालणारी प्रक्रीया आहे त्यात पुढची पिढी घडविण्याचे सामर्थ्य आहे त्यामूळे या विषयात काम करावे असा तिचा नेहमीच प्रयत्न असतो…महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या घराची आणि समाजाची काळजी करणाऱ्या मातृशक्तीस नमन…

(स्वानंद झारे, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---