⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | महिलादिन विशेष : माधुरी, निलम, सई, स्वरा जोशी

महिलादिन विशेष : माधुरी, निलम, सई, स्वरा जोशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चार कर्तृत्ववान महिलांचे संपन्न कुटुंब

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । माझ्या कुटुंबात आई, पत्नी आणि २ लाडक्या लेकी असा समाधानी परिवार आहे. प्रत्येकाला आपली आई सुगरण आहे असे वाटते. आई जे खाऊ घालेल ते आवडते. अनेकवेळा आईने बनविलेले पदार्थ सर्वांना आवडतात. माझ्याकडेही हे असेच आहे. आई श्रीमती माधुरी घरात विविध पदार्थ बनविण्यात व्यस्त आसते. अनेक पारंपारिक पदार्थ तिलाच उत्तमपणे जमतात. तिच्या हाताला चव आहे. अलिकडे आई लघुउद्योगात उतरली आहे. तीने मुखवासचा भन्नाट फॉर्म्युला तयार केला आहे. हळूहळू मागणी वाढत गेली. काही सुपर शॉपमधूनही विक्री सुरू झाली.

आमचे पाव्हणे आणि बहिण नांदेडकर कुटुंबियांनी आईच्या या लघुउद्योगाला हातभार लावला. तो म्हणजे मार्केटींगचा. लॉकडाऊनच्या काळात ती या कार्यात अधिक व्यस्त झाली. बहिणी कडील महिलांनाही रोजगार मिळावा म्हणून आईने मोठ्या प्रमाणावर मुखवास तयार करणे सुरु केले. आता त्यात बहीण व आईचे ट्युनिंग उत्तम जमले आहे.

माझी सहचारिणी सौ. निलम ही जळगाव जनता बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. तिने एमबीए फायनान्समध्ये शिक्षण घेतले आहे. तिला शेयर बाजार आणि आर्थिक विषयांची आवड आहे. तिला निसर्गात, डोंगर दऱ्यात भटकंतीची आवड आहे. तिने अमरनाथ यात्रा एकटीने पूर्ण केली. यासह सांधण व्हॅली, कळसुबाई शिखर आणि इतर गड सर केले. मी अनिल आणि ती निलम असे नाव असल्याने लग्नानंतर ‘अनिलम’ हे नाव आम्ही सार्थ करीत आहोत. तिचे सर्व प्रसंगात पाठबळ . नवी भरारी घ्यायला ती पाठबळ देते.

मोठी लेक सईला कॉलेजमध्ये असताना पासून खेळाची आवड लागली. सॉफ्टबॉलमध्ये खेळावे असा तिने निर्णय घेतला. मग रू झाला तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धेत सहभाग. पाहता पाहता अनेक स्पर्धांमध्ये सहभाग होत तिने गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ मेडलची कमाई केली. होम रनर म्हणून उत्कृष्ट खेळ करताना गुणवत्तेच्या बळावर तिने चीन आणि तैवान येथे भारताच्या टीमचे प्रतिनिधित्व केले. याचा अभिमान आहे. सई Double Graduate होऊन आता लॉच्या दुसऱ्या वर्षाला आहे.
धाकटी लेक स्वरा आता 12 वीला आहे. ती 10 वीत विवेकानंद शाळेत पहिली आली होती. ती डॉक्टर होण्याची तयारी करते आहे.

(अनिल जोशी, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.