---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा

महिलादिन विशेष : डॉ. अनुराधा अभिजीत राऊत

---Advertisement---

कोविडच्या दोन्ही लाटांवर धैर्याने मात…

womens day special dr anuradha abhijeet raut jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । डॉ. अनुराधा राऊत यांचा परिचय पत्नी म्हणून करून देताना मला एक गोष्ट आवर्जून नमुद करायला हवी. ती म्हणजे, मी जळगावला जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालो तेव्हा जिल्ह्यावर कोविडचा महाप्रकोप सुरू होता. प्रशासन काहीसे हतबल झालेले होते. प्रशासनिक आणि आरोग्यविषयक नियोजन आम्ही २४ तास करीत होतो. तेव्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कोविड प्रतिबंधाच्या पथकात डॉ. अनुराधा या सुद्धा सेवा देत होत्या. आमची यंत्रणा बाहेर रस्त्यावर धावत होती आणि वैद्यकीय पथके हॉस्पिटलमध्ये कोविडशी लढत होती.

---Advertisement---

डॉ. अनुराधा यांचा जन्म पुलगाव (जिल्हा वर्धा) येथे झाला. बालपणही तेथे गेले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला आणि खेळाची आवड होती. पुढे बारावी नंतर वैद्यकीय शिक्षण घेतले. सन २०१७ मध्ये मध्ये वायसीडीसी, अहमदनगर येथून बीडीएस पूर्ण केले. त्याचवर्षी आमच्या लग्नानंतर त्यांनी ताबडतोब भारती विद्यापीठ, सांगली येथून पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच एमडीएस एन्डोडोन्टिक्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम त्यांनी सन २०२० मध्ये टॉपर म्हणून उत्तीर्ण केला.

त्यानंतर त्यांनी २०२०-२०२१ मध्ये जळगाव येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. याच काळात कोविड नियंत्रण पथकातही कर्तव्य निभावले. अलिकडे सरकारी सेवेचा राजीनामा दिला. सध्या त्या खाजगी तज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे विशेष वैद्यकीय कौशल्य सौंदर्य दंतचिकित्सा आणि स्माईल डिझायनिंगमध्ये आहे. दंतचिकित्सक हे डॉक्टर अभियंता आणि कलाकार यांचे मिश्रण असल्याने त्यांनी स्वतः दंतचिकित्सा हा व्यवसाय निवडला आहे.

माझ्या नोकरीत वारंवार बदल्या होतात. या अडचणीमुळे डॉ. अनुराधा यांना स्वतःचे दंत चिकित्सालय सुरू करता आलेले नाही. पण एकदा आम्ही पुण्या-मुंबईला गेलो की तेथे त्या नक्कीच स्वतःचे दंत चिकित्सालय स्थापन करतील. डॉ. अनुराधा स्वभावाने खूप आनंदी, मिलनसार आणि मैत्रीपूर्ण आहेत. म्हणूनच त्या मला जीवनसाथी म्हणून उत्तम प्रकारे पूरक आहेत.

(अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---