महाराष्ट्रराष्ट्रीय

अतिवादी विचार सोडून महिलांना सशक्त केले पाहिजे – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । विजयादशमीनिमित्त नागपुरातील रेशीमबाग येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांसमोर आपले विचार मांडले . यावेळी ते म्हणाले कि, अतिवादी विचार सोडून महिलांना सशक्त केले. पाहिजे व्यक्तिनिर्माणाचे काम करत असताना संघ व समितीचे काम वेगवेगळे काम चालते. मात्र समाजाच्या इतर कामांत पुरुष व महिला एकत्रितपणे काम करतात. मातृशक्तीची उपेक्षा होऊच शकत नाही. महिलांना सशक्त करावे लागेल. महिलांना माता मानले जाते. मात्र त्यांच्या सक्रियतेची चौकट मर्यादित करण्यात आली आहे. महिलांना पुजाघरात बंद करून ठेवणे हे योग्य नाही. अतिवादी विचार सोडून त्यांना सशक्त केले पाहिजे. सार्वजनिक, कौटुंबिक कार्यात त्यांना निर्णयप्रक्रियेत समान संधी द्यायला हवी.

यावेळी पर्वतारोही संतोष यादव उपस्थित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

याच बरोबर ते असेही म्हणाले की, आज नवनवीन बदल होत आहेत. जगात देशाची विश्वसनियता व प्रतिष्ठा वाढली आहे.देशाचे वजन वाढत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत आपण स्वावलंबी होत आहोत. अर्थव्यवस्था आता सुधारत आहे व तिची प्रगती होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते

Related Articles

Back to top button