मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

तरुणाने घरात घुसून महिलेला मागून मिठी मारली अन्.. जामनेरातील धक्कादायक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । राज्यासह जळगाव महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नसून अशातच जामनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरी एकटी असल्याचा फायदा घेत एका २५ वर्षीय तरुणाने घरात घुसून महिलेला मागून मिठी मारून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संशयित तरुणाविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका खेडेगावात २५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महिला ही घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत गावात राहणारा नराधम विष्णू दल्लू चव्हाण याने घरात घुसन तिच्या मुलाला महिलेकडे दिले.

त्यानंतर महिलने मुलाला जवळ घेत मागे फिरताच तिच्या अश्लिल चाळे करत मिठी मारली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विष्णू दल्लू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रियाज शेख करीत आहे.