जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । महिलांवर होणारे अत्याचार थांबतच नाहीय. यातच एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. महिलेसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
एरंडोल तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या पतिसह वास्तव्याला असून ते मासेमारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ सप्टेंबर रोजी पिडीत महिला ही आपल्या पतीसह हनूमंतखेडा शिवारातील शेताजवळ मासे पकडण्यासाठी गेले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका झाडाखाली महिला बसलेले होते. तिचे पती स्वयंपाकासाठी सरपण घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात गेले होते.
दरम्यान, संशयित आरोपी राहूल विष्णू भिल हा तिथे आला. त्यावेळी त्यांने विवाहितेसोबत अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केला. व तिथून निघून गेला. परत थोड्यावेळाने महिला बसलेल्या ठिकाणी हातात कोयता घेवून आला. तिला व तिच्या पतीला कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहूल भिल याच्या विरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन सुर्यवंशी करीत आहे.