शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचे यश
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । सातत्याने असलेल्या पोटदुखीवर इलाज करण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला गर्भाशयाच्या गाठीचे निदान झाले. त्यानंतर सदर महिलेची गर्भपिशवी काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पार पडली व महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत सदर महिलेला रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील ४८ वर्षीय महिलेला पोटात दुखत असल्याबाबत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने निदान केल्यानंतर सदर महिलेला पोटात गर्भाशयात गाठ असल्याचे दिसून आले. त्यानंतर सदर महिलेचा जीव वाचण्यासाठी तातडीने गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया वैद्यकीय पथकाने केली. यानंतर महिलेला आराम मिळाला. शुक्रवारी सदर महिलेला अधिष्ठाता डॉ, जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत सदर महिलेला रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
सदर महिलेवर उपचार करण्याकामी विभाग प्रमुख सहायक प्रा. डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. मोहिनी पाटील, डॉ.प्रदीप लोखंडे, डॉ. संजीवनी अनेराय, डॉ. विनेश पावरा, डॉ. प्रणिता खरात, डॉ. शबनम मिर्जा, इन्चार्ज सिस्टर आर.एन. पालीवाल, परिचारिका शीतल तायडे, संजय चित्ते यांच्यासह कर्मचारी अमोल दाभाडे, मोहन कोळी, लीना कनोजिया, शोभा चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.