जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । येथी दादावाडी परिसरात लहान मुलांच्या भांडणातुन चक्क महिलेला शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक असे की, दादा वाडी परिसरातील रहिवासी कविता भगवान पाटील (वय-४५) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले. लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून कविता पाटील यांना लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही.) यांनी तोंडावर चप्पल मारली व शिवीगाळ करून मारहाण केली. यात कविता पाटील या जमीनीवर पडल्याने त्यांच्या डोक्यालाख मुक्का मार लागला आहे. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कविता पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवार ५ एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दिपक कोळी हे करीत आहे.