---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

खडसे म्हणाले गुलाबराव पाटलांच मंत्रीपद जाणार ! वाचा सविस्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । राज्यात सध्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराची जोरादार चर्चा सुरू आहे. अश्यातच कोणत्याही परिस्थितीत १९ जूनपूर्वी विस्तार होणारच असा नवा दावा आता केला जात आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना आणि भाजपचे ५ मंत्री घरी बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यात मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव पुढे येत आहे.

gulabrao patil 9 jpg webp

यंदा मंत्रीपद घेऊन सरकारची कामगिरी लोकांत पोचविण्यात कमी पडलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवू न शकणाऱ्यांना ‘नारळ‘ मिळू शकतो. असे म्हणाले जात आहे. यावरून जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जाऊ शकते असे म्हणले जात आहे.

---Advertisement---

गुलाबराव पाटील यांच्यावर जलजीवन मिशन योजनेत गैरव्यव्हार केल्याचा ठपका आहे जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचे रिपोर्ट दिल्लीमध्ये गेले असावेत, यामुळे गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जाऊ शकते. असे आ. एकनाथराव खडसे म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी उघडकीस येत आहेत. भाजपच्या हायकमांडने महाराष्ट्रामधील शिवसेनेचे जे 5 कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे, अशी भूमिका घेतल्याची बातमी समोर येत असल्याचे खडसे म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---