⁠ 
रविवार, मे 19, 2024

जिल्ह्यात १३ ऑगस्ट रोजी होणार रानभाजी महोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। कल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लबतर्फे रविवारी (ता. १३) रानभाजी महोत्सव होणार आहे. आत्माचे प्रकल्प संचालक पा. फ. साळवे यांनी ही माहिती दिली. सकाळी नऊ ते दुपारी तीन, या वेळेत रोटरी क्लब, मायादेवीनगर, महाड रोड येथे हा महोत्सव होइल.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवादरम्यान जिल्ह्यातील शेतकरी करटोली, आघाडा, पाचरी, घोळ, सांदळा कुई, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग आदी रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत.शेतकरी गटांमार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, तालुकास्तरावर ९ ते १५ ऑगस्टपर्यंत हा महोत्सव सप्ताह स्वरूपात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

जास्तीत जास्त नागरिकांना या रानभाज्या महोत्सवात खरेदीच्या आनंदासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व आत्मा प्रकल्प संचालकांनी केले आहे.