पत्नीला माहेरी सोडायला गेला, इकडे घरात चोरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. आदर्श नगरातून पत्नीला माहेरी अमरावती येथे सोडायला गेल्यानंतर वैभव मनोहरराव ठोसर (वय ३५) या तरुणाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३० हजारांची रोकड व दागिने असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी उघडीच आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव हे डी-मार्ट येथे नोकरीला आहे. आदर्श नगरात पत्नी दीपिका व मुलगी असे वास्तव्याला आहेत. शुक्रवारी साप्ताहिक सुटी असल्याने वैभव पत्नीला सोडण्यासाठी अमरावती येथे गेले होते. तेथून शनिवारी घरी परत आले असता घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तुटलेले होते तर हॉलमध्ये जशाच्या तशा वस्तू होत्या. बेडरूममध्ये कपाट उघडे होते, तर त्यातील साहित्य अस्ताव्यस्त होते. त्याशिवाय कपाटाला लागून असलेल्या ड्रेसिंग टेबलमधील वस्तू देखील अस्ताव्यस्त होत्या.
कपाटात ठेवलेले ३० हजार रुपये रोख २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन भार वजनाचे चांदीचे दागिने, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर वैभव यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा :
- चोपड्यात गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक