---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

दारुच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार; फुफनीतील धक्कादायक घटना

---Advertisement---

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । जळगाव तालुक्यातील फुफणी येथे दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. 

---Advertisement---

 

त्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. नंदा प्रकाश पाटील (वय ३५) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.

 

फुफनी येथे प्रकाश पाटील हे पत्नी नंदा व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. प्रकाश पाटील यांना दारुचे व्यसन जडले आहे. यावरुन त्यांचे व पत्नी नंदा यांच्यासोबत नेहमीच खटके उडून वाद होतात. रविवारी दुपारी नंदा व दोन मुले घरी होते. यावेळी प्रकाश पाटील हे मद्यप्राशन करुन आले. नंदा पाटील यांनी त्यांना दारु का पितात? असे म्हटले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून मद्याच्या नशेत असलेल्या प्रकाश पाटील यांचा राग अनावर झाल्याने घरातील कुऱ्हाडीने त्यांनी पत्नी नंदाच्या डोक्यात वार केले. त्यानंतर दोन्ही मुले भितीने गावात असलेल्या त्यांच्या काकाच्या घरी धावत गेले.

 

नातेवाइकांसह ग्रामस्थांनी धाव घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडलेल्या नंदा पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या बेशुद्ध असून प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---