कुऱ्हाडीने वार करून पत्नीकडून पतीचा खून; रावेरमध्ये खळबळ

सप्टेंबर 1, 2025 2:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढताना दिसत असून अशातच रावेरमधील निंभोरा येथून खुनाची घटना समोर आलीय. पत्नीने पतीचा कुऱ्हाडी वार करून खून केल्याची घटना उघडकीस आलीय. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

murder raver

या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात पोलिस नाईक अविनाश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सेवानिवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी (वय. ६५) शनिवारी रात्री घरी होते. या वेळी सततचे भांडण व मारहाणीला कंटाळलेल्या त्यांच्या पत्नी हुजराबाई हुसेन तडवी (वय. ६०) यांनी हुसेन तडवी यांच्या डोक्यावर, मानेवर कुऱ्हाडीने वार केला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर गावातील तरुणांनी गणेश कॉलनीत गर्दी केली होली. घटनास्थळी निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, पीएसआय अभय ढाकणे, अविनाश पाटील, अमोल वाघ, किरण जाधव, प्रभाकर ढसाळ, महिला कॉन्स्टेबल मोरे आदींनी भेट दिली. दरम्यान, मृत हुसेन तडवी यांचे रविवारी सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मूळगावी कुंभारखेडा येथे दफनविधी झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories