मुलाला भेटून घरी परतणाऱ्या जळगावच्या दाम्पत्यावर काळाचा घाला ; पत्नी ठार, पती जखमी

सप्टेंबर 17, 2025 9:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पुणे येथे मुलाला भेटून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. ट्रेलरने कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघतात पत्नी जागीच मृत्यू झाला. मिताली सुहास पाटील (५८, रा. विनोबानगर) असं मृत महिलेचं नाव असून या अपघतात त्यांचे पती सुहास राजाराम पाटील (६०) व चालक योगेश नारायण बारी (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला.

accd

निवृत्त कृषी अधिकारी सुहास पाटील व मिताली पाटील हे दाम्पत्य चालक योगेश बारी याच्यासह कारने (एमएच ०३, एडब्ल्यू २६६१) पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते जळगाव येथे घरी परत येत होते.

यादरम्यान, अजिंठा घाट उतरल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रेलरवरील (एमएच २१, बीवाय ४९१६) चालकाचे नियंत्रण सुटले व ते थेट कारवर येऊन धडकले. कारचा ट्रेलरच्या खाली दबून चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला. तर पतीसह चालक हे जखमी झाले आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now