⁠ 

जळगाव जिल्ह्यात १७ मजली हून मोठी इमारत का नाही? हे आहे खरे कारण

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यातील कोणीही सर्वसामान्य माणूस जेव्हा पुणे – मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जातो, तेव्हा त्याच्या मनात एक साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे इथे असलेल्या मोठ्या मोठ्या इमारती आपल्या जळगाव जिल्ह्यात किव्वा शहरात का नाहीत? याचे उत्तर शोधायचा प्रयत्न कित्येक जळगावकर करतात आणि म्हणतात की महानगरपालिके पेक्षा इतर कोणतेही इमारत मोठी होऊ शकत नाही. मात्र हेच्या मागचं खरं कारण हे नाही. त्याच्या मागचा खरं कारण तुम्हाला जाणून घ्यायच आहे का? जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा ही संपूर्ण बातमी.

मुंबई पुणे आणि तशाच मोठ्या शहरांमध्ये (एम.एम.आर.डी.ए) किती मोठी इमारत बांधावी याचा अधिकार तिथल्या अग्निशमन दलाला देण्यात आला आहे. अग्निशमन दलाने दिल्या परवानगी नुसारच तिथे बांधकाम परवानगी दिली जाते. अग्निशमन दलाने जर परवानगी नाकारली तर मोठ्या शहरांमध्ये ती इमारत बांधली जात नाही. यामुळे मोठ्या शहरांमध्ये अग्निशमन दलाला प्रचंड सन्मान दिला जातो. मात्र जळगाव जिल्ह्यातील एकही शहर (एम.एम.आर.डी.ए) मध्ये बसत नाही.

तर दुसरीकडे ग्रामीण भागात केवळ ५० मीटर उंचीचे इमारती भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात आपण मोठ्या इमारती झालेल्या पाहत नाही. जळगाव जिल्हातील बहुसंख्य भाग हा ग्रामीण भाग आहे.

मात्र जळगाव शहराचा विचार केला तर जळगाव शहर ना ग्रामीण भागात येत. ना मोठ्या शहरी भागात. अश्यावेळी ‘अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ यांनी घालून दिलेल्या नियमानुसार एम.एम.आर.डी.ए अंतर्गत न येणाऱ्या इतर सर्व लहान शहरांमध्ये केवळ ७० मीटर उंचीच्या इमारती बांधण्यास परवानगी आहे. इमारतीचा एक मजला हा जवळजवळ १२ फुटाचा असतो. असा अंदाज लावल्यास ७० मीटर मध्ये २२९ फूट आसतात. जर २२९ फुटांना १२ फुटांनी भगिले तर 18 मजले होतात. अशाने जळगाव शहरात केवळ अठरा मजली इमारत बनू शकते. मात्र इतकी मोठी इमारत बनवण्यासाठी लागणारी जागा जळगाव शहरात नसल्याने अजून पर्यंत जळगाव शहरातील कोणत्याही बांधकाम व्यवसायकाने इतकी मोठी इमारत बनवण्याचा प्रयत्न केला नाहीये.

एखाद्या ठिकाणी जर विमानतळ असेल तर विमानतळाच्या आजूबाजूला मोठ्या इमारती बांधता येत नाहीत विमानतळाची देखील परवानगी घ्यावी लागते मात्र जळगाव शहरात लगत असलेल्या विमानतळाच्या आजूबाजूला फ्लाईंग झोन आहे मात्र विमानतळ जळगाव शहरात येत नाही. यामुळे विमानतळाचा अर्थ जळगाव शहरात मोठा इमारतींना होऊ शकत नाही.