आई – वडिलांची सेवा का करतेस? म्हणत भावाने केली बहिणीला मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ एप्रिल २०२३ : आई वडिलांची सेवा करते आहे म्हणून भावाने बहिणीला तिच्या सासरी जात मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई- वडिलांची सेवा का करतेस? असे म्हणत सख्ख्या बहिणीला सासरी जाऊन घरात घुसून मारहाण केली.

हासिनाबी मुस्सा शेख (वय ४०, रा. पांढरवाडी) असं मारहाण करण्यात आलेल्या विवाहित बहिणीचे नाव आहे. त्या आपल्या आई-वडिलांची सेवा करतात. त्यांच्यासाठी त्यांनी पत्र्याचे शेडही तयार केले आहे. परंतु मालमत्ता व इतर गोष्टींचा संशय घेऊन हासिनाबी यांचा भाऊ शेख निजाम कचरू शाह याने इतर तीन व्यक्तींसह पांढरवाडीत जाऊन हासिनाबी यांना मारहाण केली. हि घटना बीढ जिल्ह्यात घडली आहे.

भावाने केलेल्‍या मारहाणीत हासीनाबी यांना जबर मार लागला असून याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात भाऊ शेख निजाम याच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.