कोण होणार मनपातील भाजपचा गटनेता ? निकाल लवकरच
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । जळगाव शहर महापालिकेच्या गटनेत्याचा निकाल लवकरच लागणार आहे. औरंगाबाद खंडपीठात याबाबाद खटला सुरु असून निकाल लवकरच लागणार आहे. यामुळे भाजपाचा गटनेता कोण ? भगत बालाणी कि दिलीप पोकळे हे आता लवकरच ठरणार आहे. महापालिकेत झालेल्या अभूतपूर्ण सत्त्ता पालटानंतर भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या 29 नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आणि नवीन पदाधिकारी नियुक्त केले होते. या विरोधात भाजप विरुद्ध फुटीर गट असा न्यायालयीन लढा सुरु असून याचा निकाल लवकरच लागणार आहे.असे म्हटले जात आहे.
जळगाव महापालिकेत भाजपच्या 29 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या जयश्री महाजन या जळगाव महापालिकेच्या महापौर झाल्या. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली. यानंतर फुटीर भाजप नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक घेऊन महापालिकेत नवीन पदाधिकारी नियुक्त केले. याबाबत या गटाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी महापौरांना लेखी पत्र देऊन नवीन पदाधिकारी नियुक्तीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. भाजपचे गटनेते असलेले भगत बालानी यांना बदलून त्यांच्या रिक्त जागेवर दिलीप बबनराव पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर उपगट नेते राजेंद्र झिपरु पाटील यांच्या जागी चेतन गणेश सनकत यांची निवड करण्यात आली होती.
मात्र या निर्णयाला भाजपने न्यायालयात आव्हान दिले होते. या बाबद गेल्या वर्षभरापासून सुनावणी सुरु होती. हि सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून याचा निर्णय लवकरच लागणार आहे. असे म्हटले जात आहे.